वाहतूक वारंवार ठप्प होत असल्याने वाहनचालकांतून तीव्र संताप : रहदारी पोलिसांया नियुक्ती नितांत आवश्यकता

वार्ताहर /सांबरा
एससीमोटर्स ते शिंदोळी क्रॉसपर्यंतच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहन चालकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. य् ाा मार्गावर नेहमीच विमानतळ व वायुदल केंद्रामुळे वाहनांची वर्दळ असते. रस्ता अरुंद असल्याने वारंवार रहदारी ठप्प होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे शासनाने या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. मागील एक दीड महिन्यापासून कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे. मात्र गेल्या आठ दिवसापासून सदर काम अत्यंत संथगतीने चालले आहे. अशा प्रकारे जर काम होत असेल तर पावसाळ्य़ापूर्वी या रस्त्याचे काम होणे अशक्यच आहे.
रहदारी पोलिसांची नेमणूक करा
च् ााwपदरीकरणाच्या कामामुळे सध्या या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. मात्र या मार्गावर रहदारी पोलिसांचा अभाव व काही बेशिस्त वाहन चालक यांच्यामुळे या रस्त्यावर दररोज रहदारी ठप्प होत आहे. अशाने वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी दोन रहदारी पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी वाहन चालकांतून होत आहे. वास्तविक रहदारी पोलिसांनी वाहतूक सुरळीत करणे गरजेचे आहे. मात्र रहदारी पोलीस मार्च एंडचा टारगेट पूर्ण करण्यातच धन्यता मानत आहेत. टार्गेटच्या नावाखाली निष्पाप वाहन चालकाना ते टार्गेट करताना दिसत आहे. त्यामुळे रहदारी पोलिसांनी आधी वाहतूक सुरळीत करावी व त्यानंतरच इतर वाहन चालकांवर कारवाई करावी अशीही मागणी जोर धरू लागली आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
य् ाा रस्ता कामाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींनी रस्त्याच्या कामाची पाहणी करावी व कंत्राटदाराला काम दर्जेदार व लवकर पूर्ण करण्यास भाग पाडावे अशी मागणी वाहन चलकांतून होत आहे.









