ऑनलाईन टीम/तरुण भारत
शास्त्रज्ञांनी प्रथमच चंद्राच्या मातीवर वनस्पती उगवल्या आहेत, जे भविष्यातील अंतराळ मोहिमेदरम्यान चंद्रावर अन्न आणि ऑक्सिजन तयार करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अपोलो मिशन ११, १२ आणि १७ मध्ये अंतराळवीरांनी माती पृथ्वीवर परत आणली होती. प्रयोगासाठी त्यांच्याकडे फक्त १२ ग्रॅम चंद्रावरील माती होती. युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडा (यूएफ) येथील यूएस संशोधकांनी दाखवून दिले की चंद्राच्या मातीत रोपे यशस्वीपणे उगवू शकतात आणि वाढू शकतात.
दरम्यान, पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्रावरील वातावरण कसं आहे, याबाबतही भारतासह अनेक देशांनी तिथं मोहिमा पूर्ण केलेल्या आहेत. चंद्रावर मोहिम करण्यात नेहमीच अमेरिका आणि रशिया हे दोन देश पुढे राहिलेले आहेत. विविद देशांच्या चंद्रमोहिमांच्या माध्यमातून प्रत्येक देशानं चंद्रावरील वातावरण आणि तिथं मानवी वस्ती होऊ शकते का, याचा अभ्यास केलेला आहे. परंतु आता अमेरिकेतील काही शास्त्राज्ञांनी चक्क चंद्रावरुन आणलेल्या मातीत रोपटं उगवून दाखवलं आहे. अमेरिकेतल्या फ्लोरिडा विद्यापीठातल्या काही शास्त्रज्ञांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यामुळं नासासह जगभरातील अंतराळ संस्थांसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
कम्युनिकेशन्स बायोलॉजी या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या अभ्यासात, चंद्राच्या मातीला वनस्पती जैविक रीतीने कसा प्रतिसाद देतात, याला चंद्र रेगोलिथ असेही म्हणतात, जी पृथ्वीवर आढळणाऱ्या मातीपेक्षा खूप वेगळी आहे, याचा शोध घेतला.
काही वर्षांपूर्वी अमेरिकेची प्रसिद्ध अंतराळ संस्था असलेल्या नासाने अपोलो मोहिमेअंतर्गत चंद्रावरुन माती आणली होती. याशिवाय शास्त्रज्ञांनी चंद्रावरुन ३८२ किलो वजनाचे दगडही आणले होते. चंद्रावरुन आणलेल्या मातीत रोपटं उगवल्यानं आता तिथं मानली वस्ती होऊ शकणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता वाढली आहे. ऑपरेशन अपोलोच्या माध्यमातून चंद्रावरुन आणलेल्या मातीपैकी नासाकडून आम्हाला फक्त १२ ग्रॅम माती मिळाली, इतक्या कमी मातीत रोपटं उगवणं ही फार अवघड गोष्ट होती, परंतु आता आम्हाला या शोधात मोठं यश मिळाल्याची माहिती फ्लोरिडा विद्यापीठाचे प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ रॉबर्ट फेरी यांनी दिली आहे.