ऑनलाईन टीम / तरुण भारत :
रशियाची ‘Sputnik-V’ ही कोविड लस विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक असलेल्या आंदे बोटिकोव्ह यांची राहत्या घरी बेल्टने गळा आवळून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. रशियन वृत्तसंस्था ‘टास’ने यासंदर्भात माहिती दिली आहे.
आंदे बोटिकोव्ह हे रशियातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते. ‘Sputnik-V’ लस तयार करणाऱ्या 18 शास्त्रज्ञांपैकी ते एक होते. गुरुवारी ते त्यांच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आले होते. तपासादरम्यान 29 वर्षीय तरुणाने एका भांडणाच्या वेळी बोटिकोव्ह यांचा बेल्टनं गळा दाबला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने संशयित तरुणाला अटक केली आहे.
बोटिकोव्ह यांच्या कोविड लसीवरील कामाबद्दल त्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 2021 मध्ये ‘ऑर्डर ऑफ मेरिट फॉर द फादरलँड’ पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.









