राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजन
प्रतिनिधी/ बेळगाव
माहेश्वरी अंध मुलांची शाळा व व्हिजन एम्पॉवर संस्था, बेंगळूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. याचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून एसएसएलसी नोडल अधिकारी रिजवान नावगेकर, व्हिजन एम्पॉवरच्या रिजनल मॅनेजर राजेश्वरी पी., राज्य सहसंयोजक सृष्टी बिरादार व श्रेया बी. एन. उपस्थित होत्या. व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष आनंद जोशी, ईसीओ अपर्णा यळ्ळूरकर उपस्थित होते.
प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष वादिराज कलघटगी यांनी सर्वांचे स्वागत केले. राजेश्वरी यांनी व्हिजन एम्पॉवरबद्दल माहिती दिली. महादेव सुतगट्टी यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व सांगितले. या प्रदर्शनात शाळेच्या विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान यांचे विविध प्रयोग करून दाखविले. अनेक गमतीदार खेळही यावेळी घेण्यात आले.
या प्रदर्शनात सरकारी शाळा, रामनगर, पीएचक्यू, शर्मन स्कूल येथील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. संस्थेचे पदाधिकारी श्रीनिवास शिवणगी, राजशेखर हिरेमठ यांनी तसेच पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. सूत्रसंचालन शिल्पा कुसलापूर यांनी केले. बसलिंगम्मा हिने पाहुण्यांचा सत्कार केला. मुख्याध्यापिका अनिता गावडे यांनी आभार मानले.









