जोरदार पाऊस झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश : केवळ खानापूर तालुक्यातील पदवीपूर्व महाविद्यालयांनाही सुटी
► प्रतिनिधी / बेळगाव
मंगळवारी पुन्हा जोरदार पाऊस झाल्यामुळे बेळगाव शहर, तालुका यासह खानापूर, मुडलगी, सौंदती, यरगट्टी, निपाणी तालुक्यांतील प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज बुधवारी दि. 26 रोजी सुट्टी जाहीर केली आहे. केवळ खानापूर तालुक्यातील पदवीपूर्व महाविद्यालयांनाही एक दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र सोमवारी पाऊस कमी असल्यामुळे मंगळवारी पूर्ववत शाळा सुरू झाल्या. परंतु मंगळवारी पुन्हा पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. याचबरोबर अनेक रस्त्यांवरही पाणी आले आहे. त्यामुळे ज्या तालुक्यांमध्ये अधिक पाऊस तसेच धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी शाळांना सुटी दिल्या आहेत.
प्राथमिक, माध्यमिक या शाळांना सुट्टी जाहीर करण्याबराब्sारच अंगणवाडी केंद्रांनाही सुट्टी देण्यात आली आहे. खानापूर तालुक्यातील पदवीपूर्व कॉलेजांना देखील सुटी जाहीर करण्यात आली आहे. तरी याची पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले आहे.









