इम्फाळ व्हॅली, जिरीबाम जिल्ह्यातील शाळा, कॉलेज बंदचे आदेश
मणिपूरमधील शाळा, कॉलेज अनेक दिवसांपासून बंद आहेत. हिंसक परिस्थितीमुळे राज्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेज पुन्हा सुरु करण्याच्या निर्णयाला पुन्हा स्थगिती देण्यात आली आहे. सोमवार आणि मंगळवार (दि.२५, २६ नोव्हेंबर) ला शाळा बंद राहतील असे आदेश देण्यात आलेले आहेत. जीवनावश्क वस्तू खरेदीसाठी कर्फ्युच्या निर्बंधात सुटका देण्यात आली. येथील इंटरनेट सेवा २५ पर्यंत बंद राहील असेही आदेश देण्यात आलेले आहेत. एक आठवड्यापासून राज्यातील परिस्थितीमुळे राज्यातील येथील शाळा, कॉलेज बंद आहेत.









