कोल्हापूर
पिशवी तालुका शाहूवाडी येथील श्रीधर संजय होनागडे वय वर्ष १४ हा शालेय विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षा घरी देऊन परत येत असताना ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्याची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली.
मिळालेल्या माहिती नुसार श्रीधर होनागडे हा आठवीच्या शिकत होता . रविवारी तो स्कॉलरशिप ची परीक्षा देण्यासाठी बांबवडे येथे गेला . परीक्षा झाल्या नंतर घरी येण्यासाठी ऊस वाहतूक करण्राया ट्रॅक्टर मधून बसून येत असताना त्याचे घराजवळ उतरण्याचे ठिकाण मागे गेल्याने त्याने चालत्या ट्रॅक्टर मधून खाली उडी घेतली . यावेळी त्याच्या पाठीवरील दप्तराची बॅग ट्रॉलीच्या हुकात अडकली . तो खाली पडला तेव्हा त्याच्या अंगावरून ट्रॉलीची चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला . या घटनेची माहिती मिळताच शाहूवाडी पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस काका स्वामी यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन मलकापूर ग्रामीण रुग्णालयात करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला . विद्यार्थ्याच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे . घटनेचा तपास शाहूवाडी पोलीस करत आहेत
स्वप्नच धुळीस मिळाले
ट्रॅक्टर अपघातात मृत झालेल्या श्रीधरच शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश मिळवून भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षेत आपले गुणवत्ता कायम राखण्याचे स्वप्न या अपघाताने धुळीस मिळाले .मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने आपल्या मुलाला घडवण्यासाठी आई-वडिलांच्या कष्टाला देखील या घटनेने धक्का बसला. भविष्याची स्वप्न रंगवत शिष्यवृत्ती परीक्षेला गेलेल्या श्रीधर व्हनागडे याच या अपघातात स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवून यशोशिखरावर जाण्याचे स्वप्न स्वप्न धुळीस मिळालं .या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
Previous Articleपतीचा खून करणाऱ्या महिलेची हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात रवानगी
Next Article बदलीच्या आमिषाने कॉन्स्टेबललाच १३ लाखाचा गंडा








