प्रतिनिधी / बेळगाव : राजस्थानमधील जल्लोर जिल्ह्यातील एका शाळकरी विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केली. त्यात त्या विद्याथ्याचा मृत्यू झाला. तो अनुसुचित जातीचा होता. त्याने पाण्याच्या मडक्याला हात लावला म्हणून मारहाण केली. ही बाब अत्यंत गंभीर आहे. मारहाण करणाऱ्या त्या शिक्षकाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी, कर्नाटक अनुसुचित जाती आणि वाल्मिकी समाजाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
विद्यार्थी इंद्रकुमार एम हा तीसरीमध्ये शिकत होता. त्याने पिण्याच्या पाण्याच्या मडक्याला हात लावला म्हणून शिक्षकाने मारहाण केली. सदर विद्यार्थी हा अनुसुचित जातीचा असल्यामुळे शिक्षकाने मारहाण केली. यामध्ये त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तेव्हा तातडीने त्या शिक्षकाला शिक्षा द्यावी असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी राम पुजारी, नायक, विजय बोरटे, सचिन कोलकार, अखिल सत्यण्णावर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









