जिल्ह्यातील शैक्षणिक परिस्थिती अत्यंत विदारक – अर्चना घारे यांचा आरोप
सावंतवाडी प्रतिनिधी
कायमस्वरूपी शिक्षक मिळावे या मागणीसाठी विद्यार्थ्यांनीच शाळा बंद आंदोलन पुकारल्याची घटना सावंतवाडी मतदारसंघात घडली आहे. सावंतवाडी परिसरातील शाळांमध्ये अत्यंत विदारक चित्र आज या शाळा भेटी दरम्यान राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ.अर्चना घारे यांनी केलेल्या शाळा भेटी दरम्यान पाहायला मिळालं . विशेष म्हणजे या मतदासंघाचे आमदार मा. दिपकजी केसरकर हेच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आहेत,असे असताना देखील सावंतवाडी तालुक्यातील शाळांमध्ये ही परिस्थिती पाहायला मिळत आहे.या भेटी दरम्यान बोलतांना अर्चना घारे म्हणाल्या की , “ज्या कोवळ्या वयात मुलांनी शिक्षणाचे धडे गिरवायला हवेत, त्या कोवळ्या वयात मुलांना आंदोलन करावे लागणे ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. या मुलांच्या भवितव्याच्या होणाऱ्या नुकसानीस कोण जबाबदार आहे..? असा प्रश्न त्यांनी या निमित्ताने विचारला. सावंतवाडी जिल्ह्यात सुमारे एक हजार शिक्षकांची भरती प्रलंबित असून देखील शिक्षक भरती घेत नसल्याने मुलांच्या शालेय शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी मा. दिपकजी केसरकर यांनी या गोष्टींमध्ये तातडीने लक्ष देण्याची गरज आहे”.
या भेटीदरम्यान सरपंच सोनिया सावंत, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष राजन मडवळ, ग्रामपंचायत सदस्य अनुराधा गावडे, सुर्यकांत सावंत, मंगेश सावंत, आनंद गावडे, भरत सावंत , सुहास गावडे, योगेश परब, दिपक सावंत, आनंद मिस्त्री, गुरु कुणकेकर यांसह परिसरातील पालक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.









