प्रतिनिधी/ बेळगाव
कणबर्गी येथील महेश फैंडेशनमध्ये शिकणाऱ्या वंचित मुलांसाठी आयसीआयसीआय फौंडेशनतर्फे स्कूल बस देण्यात आली. यावेळी आयसीआयसीआय फौंडेशनचे झोनल हेड वेंकटेश बी. के. उपस्थित होते.
आयसीआयसीआय फौंडेशनच्या सीएसआर उपक्रमाचा एक भाग म्हणून वंचित मुलांसाठी सुरक्षित व आरामदायी वाहतूक व्यवस्था व्हावी, यासाठी 53 आसनी स्कूल बस देण्यात आली. बेळगावच्या विविध झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या आणि उत्कर्षा लर्निंग सेंटरमध्ये शिकणाऱ्या 275 वंचित मुलांना स्कूल बसचा फायदा होणार आहे.
प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले. त्यांनी महेश फौंडेशनच्या कार्याचे कौतुक करत आयसीआयसीआय फौंडेशनचे आभार मानले. एखाद्या कॉर्पोरेट शाळेपेक्षाही महेश फौंडेशनमध्ये उत्तम सेवा दिल्या जात असल्याचे आमदार अनिल बेनके यांनी यावेळी सांगितले. महेश फौंडेशनचे संस्थापक महेश जाधव यांनी आभार मानले. यावेळी प्रकल्प व्यवस्थापक वेणुगोपाल राव, विभागीय प्रमुख अब्दुलजीज नदाफ, विकास अधिकारी राजेसाहेब शिकारी यासह इतर उपस्थित होते.









