संग्राम काटकर,कोल्हापूर
ज्युनिअर कॉलेजातील बारावीच्या पदक प्राप्त खेळाडूंसह पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेताना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवून शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा विभागाशी प्रथम वर्षी जोडल्या जाणाऱ्या खेळाडूंसाठी खुषखबर आहे. खेळाडूंना रोख रकमेचे बक्षीस देणारी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रोत्साहनपर क्रीडा शिष्यवृत्ती योजना विद्यापीठाने अंमलात आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील वैयक्तिक, सांघिक गटात पदक पटकावणाऱ्या खेळाडू, संघाला शिष्यवृत्ती मिळणार आहे. या शिष्यवृत्तीने खेळाडूंला कीट, सराव व खुराकावर कराव्या लागणाऱ्या खर्चाची परतफेड होणार आहे. खेळाडूतही स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठीची उर्मी देखील खेळाडूत निर्माण होणार आहे.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आपल्या कल्पनेतून विद्यापीठअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली व सातारा येथील कॉलेजमधील खेळाडूंना शिष्यवृत्ती देणारी महत्वपूर्ण योजना बनवली आहे. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेने ही योजना अंमलात आणली आहे. ज्युनिअर कॉलेजात बारावीच्या शिक्षण घेणाऱ्या खेळाडूंसह पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतानाच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवून विद्यापीठाच्या क्रीडा विभागाशी जोडणाऱ्या खेळाडूंना शिष्यवृत्ती देण्याचे या योजनेत नमुद आहे. योजनेची तातडीने अंमलबजावणी करत पदक प्राप्त खेळाडू व संघांना क्रीडा विभागाकडे अर्ज करण्याचे आवाहनही केले आहे. त्यानुसार क्रीrडा विभागाकडे अर्जही येत आहेत.
कॉलेजात शिक्षण घेत विविध खेळांमध्ये स्पर्धेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंना चांगले प्रशिक्षण, उच्चप्रतीचा खुराक आणि सरावास लागणारी साधने घेताना आर्थिक ताण सोसावा लागतो. शिवाय सराव करत करत आणि स्पर्धा जिंकत जिंकत जसजसा खेळाडू वरच्या स्तरावर जातो, तसा त्याचा खर्चही वाढतो. सध्याच्या महागाईच्या दिवसात तर खेळाडूला खेळाचे कीट खरेदी करण्यापासून ते खुराकावर गेल्या काही वर्षांच्या तुलनेत जास्ती पैसा मोजावा लागतो. हा खर्च खेळाडूंच्या पालकांवर येऊन पडतो. खेळाडू जर बॅडमिंटन, टेबल-टेनिस, टेनिस, कुस्ती, नेमबाजी, ज्युदो, तायक्वाँदो, क्रिकेट असे खेळ खेळत असेल तर सराव व खुराकासाठी जास्तीच खर्च होतो. खेळाडू सामान्य व गरीब कुटुंबातील असेल तर त्याचा खर्च पेलताना पालकांची ओढाताण होते. शिवाय खर्च न केल्यास चांगले प्रशिक्षण व सरावासाठीचे आधुनिक साहित्य खरेदी करण्यावर मर्यादा येते. या मर्यादेमुळे अनेकांना गुणवत्ता असूनही खेळ थांबवावा लागतो.
हा सारा प्रकार थांबावा या तळमळीपोटी विद्यापीठाचे कुलगुऊ डॉ. शिर्के यांनी खेळाडूंना रोख रकमेचे बक्षीस देणारी प्रोत्साहनपर क्रीडा शिष्यवृत्ती योजना आखली. या योजनेनुसार राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या खेळाडूसह सांघिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या संघांनाही शिष्यवृत्ती मिळणार आहे. या शिष्यवृत्ती पालकांनी खेळाडूच्या सरावापासून ते खुराकावर केलेल्या पैशाची एका अर्थाने परतफेड होणार आहेच. शिवाय विविध खेळांच्या संघांवर कॉलेजने केलेल्या पैसेही कॉलेजला मिळून जाणार आहेत. शिवाय खेळाडूंचे पैशाअभावी आता नडणार तर नाहीच, शिवाय विद्यापीठ व संघटनांच्या पातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधीत्व करण्यासाठी ही शिष्यवृत्ती कामी येणार आहे.
क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक कामगिरीबद्दल मिळणारी शिष्यवृत्ती अशी :
सुवर्ण पदक- 50 हजार रूपये
रौप्य- 40 हजार
कांस्य- 30 हजार
सांघिक गट-
सुवर्ण पदक-25 हजार रूपये
रौप्य-20 हजार
कांस्य-15 हजार
पैशाअभावी गुणवान खेळाडू क्रीडा स्पर्धांपासून परावृत्त होऊ नये, उलट त्याला प्रोत्साहनच मिळावे या उद्देशाने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रोत्साहनपर क्रीडा शिष्यवृत्ती योजना अंमलात आणली आहे. योजनेतून एकदा शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर प्रशिक्षण व खुराकावर पैसे करण्याबाबतची चिंता लागून राहणार नाही. शिवाय त्याच्याकडील खेळातील गुणवत्ता जनमाणसांच्या नजरेआड होणार नाही. स्पर्धांमध्ये उच्चांकी कामगिरी करण्यासाठी तर ही शिष्यवृत्ती एकाप्रकारचे बुस्टच ठरणार आहे.
डॉ. दिगंबर शिर्के (कुलगुऊ : शिवाजी विद्यापीठ)
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









