Scholarship benefits 12 students of R.P.D High School in various examinations
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांजकडून आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) परीक्षा 2022 मध्ये राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज सावंतवाडी प्रशालेची कु. तन्वी प्रसाद दळवी हिने 266 गुणांसह जिल्ह्यात तिसरा तर तालुक्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकाविला आहे. तसेच कु. मानस महेश कुडतरकर 218 गुणांसह जिल्ह्यात 31 वा तर अस्मि प्रवीण मांजरेकर 202 गुणांसह जिल्ह्यात 49 वा क्रमांकाचा बहुमान पटकाविला आहे. त्याचप्रमाणे इ. 08 मध्ये कु. मंथन तुकाराम गवस 166 गुणांसह जिल्ह्यात 48 वा क्रमांकाचा बहुमान पटकाविला आहे.
तसेच राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज सावंतवाडी प्रशालेत सन 2022-23 साठी प्रवेश घेतलेल्यांपैकीकु. सोहम कोरगावकर (258गुण) जिल्ह्यात 10 वा , तालुक्यात 5 वा व कु. श्रीपाद संजय नाईक (222 गुण) जिल्ह्यात 70 वा तालुक्यात 23 वा असे यश संपादन करून शिष्यवृत्तीस पात्र ठरले..आर . पी . डी हायस्कूलचा श्रेयस केनवडेकर NMMS शिष्यवृत्तीस पात्र तर 03 विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे- १ यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२१-२२ चे आयोजन इ. ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते . ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न १५०००० च्या आत आहे तेच विद्यार्थी सदर परीक्षा देऊ शकतात आणि परीक्षा गुणवत्ता यादीत निवड झाली तर बारावी पर्यंत प्रत्येक महिन्याला १००० रू.प्रमाणे स्कॉलरशिप मिळते. सदर गुणवत्ता यादीत R. P. D. चा श्रेयस श्रीपाद केनवडेकर याची निवड झाली आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पातळीवर NMMS परीक्षा शिष्यवृत्तीच्या धर्तीवर सारथी शिष्यवृत्ती (sarathi scholarship) योजना सन 2021-2022 पासून लक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्यातील NMMS ही शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झालेले पण केंद्र सरकारची शिष्यवृत्ती अप्राप्त असलेल्या मराठा, कुणबी, कुणबी मराठा व मराठा – कुणबी या केवळ चार लक्षित गटातील पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वी पर्यंत प्रत्येक शैक्षणिक वर्षात प्रती महिन्यांकरिता 800 रुपयेप्रमाणे प्रतिवर्ष वार्षिक एकूण रक्कम रु. 9,600 /- शिष्यवृत्ती अदा केली जाईल. या सारथी शिष्यवृत्तीसाठी प्रशालेचे तीन विद्यार्थी कु. पूनम गंगाराम नाईक, कु. कुशाली नामदेव गुरव आणि कु. शिवप्रसाद सुभाष गवस हे पात्र ठरले आहेत. डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेसाठी R.P.D. च्या सोहम कोरगावकर व तन्वी दळवी यांची निवड झालीये .
सावंतवाडी / प्रतिनिधी









