खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचे सर्वांगीण विकासाचे ध्येय
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला व्याधिमुक्त जीवन जगता यावे. व्यसन आणि कुपोषणमुक्त समाज उभारावा. याकरिता केवळ आमदार म्हणून नव्हे तर डॉक्टर आमदार म्हणून सामाजिक स्वास्थ्यासाठी धडपडणाऱया आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचा आज वाढदिवस आहे. सरकारी आरोग्य यंत्रणेला दिलेला बूस्टर खानापूरवासियांना निरामय व आरोग्यमय जीवनाची शाश्वती देणारा आहे.त्यांच्या वाढदिनी त्यांनी केलेल्या विकासकामांचा घेतलेला आढावा.
डॉ. अंजली निंबाळकर यांनी आमदारपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर खानापूर तालुक्मयातील आरोग्य व्यवस्थेचा आमुलाग्र बदल करण्याचा संकल्प करून त्यादृष्टीने नियोजन करून सरकारकडे पाठपुरावा केला. त्याला यश आले आहे. वर्षभरापूर्वी एम. सी. एच. हॉस्पिटल मंजूर करून आणले. त्यानंतर खानापुरात अद्ययावत हॉस्पिटल मंजुरीसाठी प्रयत्न केले. त्यासाठी 32 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.
एमसीएच हॉस्पिटलचे काम पूर्णत्वाच्या दिशेने
खानापुरातील तालुका सरकारी इस्पितळावर तालुकाभरातून येणाऱया रुग्णांचा मोठा ताण पडतो. सामान्य रुग्ण, प्रसूती रुग्ण, अपघात व तातडीच्या उपचारासाठी आलेले रुग्ण यामुळे डॉक्टर व कर्मचाऱयांना तातडीची सेवा देणे अडचणीचे ठरत होते. ही वस्तुस्थिती ओळखून अंजली निंबाळकर यांनी स्वतंत्र एमसीएच हॉस्पिटल मंजूर करून आणले. सरकारी दवाखान्याच्या आवारातच उभारण्यात येत असलेल्या या दवाखान्यात गर्भवती महिला आणि बालकांवरील उपचारांची स्वतंत्र सोय होणार आहे. 60 बेडचे सुसज्ज हॉस्पिटल वर्षभरात सज्ज होणार आहे. यासाठी 15 कोटींचा निधी मंजूर केला आहे. हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या ठिकाणी दोन ऑपरेशन थेटर, अतिदक्षता विभाग, नवजात अर्भकासाठी लागणारे इन्क्मयुबेटर, स्वतंत्र डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या दवाखान्याच्या निर्मितीमुळे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याने रुग्णांना जलद आणि संपूर्ण उपचारांचा लाभ मिळणार आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेत अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सशक्तीकरणाला आमदार निंबाळकर यांनी वाहून घेतले आहे. कक्केरी व गणेबैल प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवे स्वरुप दिले जात आहे. कणकुंबी दवाखान्याच्या आवारातील रस्त्यांचे सिमेंटीकरण केले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना 24 तास आरोग्य सेवा उपलब्ध झाली आहे. या दवाखान्याचे छत निकामी झाल्याने दुरुस्ती करण्यासाठी 25 लाखाचा निधी मंजूर करून छताचे काम करण्यात आले.
कोरोना काळात आरोग्यसेवा तातडीने मिळविण्यासाठी स्वतः प्रयत्नशील राहून आरोग्य सेवा ग्रामीण भागात मिळवून देण्यासाठी सातत्याने शासनाशी व वैद्यकीय खात्याशी संपर्क साधून ग्रामीण भागाला सेवा मिळवून दिली. त्यामुळे कोरोना काळात सर्वांना योग्यप्रकारे वैद्यकीय उपचार मिळाले.
शेतकऱयांच्या आर्थिक समृद्धीसाठी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी बंधारे निर्मिती, तलाव विकासावर भर दिला आहे. खानापूर तालुक्मयाला विपुल जलसंपत्तीची देणगी लाभली आहे. समाधानकारक पर्जन्यमान आणि नदी-नाल्यांचे वरदान लाभलेले असतानाही केवळ पाणीपुरवठा योजना व शेतीला तारक ठरणाऱया जलसंधारण योजनांच्या अभावामुळे शेतकऱयांच्या कष्टाचे चीज होत नाही. म्हणूनच कर्जमाफी आणि तुटपुंजी नुकसानभरपाई देण्यापेक्षा शाश्वत जलसिंचन योजनांची सोय करा. अशी मागणी झाल्याने आमदारांनी गेल्या चार वर्षांपासून शाश्वत कृषी विकासाकरिता जलसंधारणाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भगीरथ प्रयत्न चालविले आहेत.
पाटबंधारे विभाग, लघुपाटबंधारे विभाग, कृषी विभाग या सर्वांच्या सोबतीने शेततळय़ांचे जाळे, नदी-नाल्यांवर नव्या बंधाऱयांची निर्मिती, जुन्या बंधऱयांची दुरुस्ती, तलाव, नाले आणि कालव्यांचे पुनरुज्जीवन यासारखी शेतीला समृद्ध करणारी शेकडो कामे राबवून शेतीतून समृद्धी आणण्याचा प्रयत्न चालविला आहे.
आमदार डॉ. निंबाळकर यांनी 2018-19 मध्ये 33 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून लिफ्ट एरिगेशन नाला, बंधारा दुरुस्ती, पूलवजा बंधारा निर्मिती, चेकडॅम अशा विविध कामांसाठी 33 कोटीचा निधी मंजूर करून कामे करण्यात आली आहेत. तसेच 2019-20 मध्ये एकूण 26 कोटी 93 लाखांच्या अनुदानातून पुढील महत्त्वाकांक्षी योजनांना मंजुरी घेतली. शेतकऱयांसाठी या निधीतून पाणी योजना राबवण्यात आल्या.
तलाव भरणा योजना राबविण्याचा मानस
आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचा पूर्व भागासाठी तलाव भरणा योजना राबविण्याचा मानस आहे. आमदार पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्याच वर्षात या योजनेसाठी 75 कोटींचा आराखडा सादर करण्यात आला होता. या प्रस्तावासाठी निजद-काँग्रेसच्या संयुक्त सरकारच्या काळात 40 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. मात्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे योजना अडून आहे.
50 कोटींच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी
पक्क्या आणि सुरक्षित रस्त्यांशिवाय भौतिक आणि आर्थिक विकास अशक्मय आहे. त्यामुळेच आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी तालुक्मयाच्या ग्रामीण भागातील राज्यमार्ग, जिल्हा मुख्य रस्ते आणि ग्रामीण संपर्क रस्त्यांच्या विकासासाठी विविध विभागाकडून 50 कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी बहुतांश कामांची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. पावसाळय़ानंतर ही सर्व कामे प्रत्यक्षात सुरू होणार आहेत. खानापूर-बिडी रस्त्याच्या विकासासाठी 15 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या रस्त्याच्या मंजुरीचे काम मार्गी लागूनही गेल्या सहा महिन्यांपासून अर्थ खात्याने कोणत्याही कारणाविना हा प्रस्ताव अडवून ठेवला आहे. आपण केवळ विरोधी पक्षाची आमदार असल्याने हा दुजाभाव केला जात आहे. इथेच नव्हे तर खानापूरच्या कोणत्याही विकासकामाबाबत राज्य सरकार दिरंगाई आणि दुर्लक्षाचे धोरण राबवत असल्याने आपले प्रयत्न तोकडे ठरत असल्याचे आमदार डॉ. निंबाळकर यांनी सांगितले.
शंभर खाटांचे इस्पितळ, 31 कोटींचे अनुदान मंजूर
आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रयत्नांनी नव्या तालुका इस्पितळासाठी 31 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून 100 बेडचे इस्पितळ, डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱयांसाठी क्वॉर्टर्स तसेच अत्यावश्यक वैद्यकीय सुविध उपलब्ध होणार असल्याने आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणाचे स्वप्न साकार झाले आहे. 100 बेडच्या हॉस्पिटलसाठी लागणाऱया इतर आवश्यक सुविधा, अतिरिक्त डॉक्टर तसेच कर्मचारी उपलब्ध होणार असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची तालुक्मयाच्या ठिकाणीच उपचाराची सोय होणार आहे. दोन एकरहून अधिक जागेत या सर्व अद्ययावत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यामध्ये 100 बेड हॉस्पिटल इमारत, डॉक्टर, स्टाफ व डी ग्रुप कर्मचाऱयांसाठी स्वतंत्र क्वॉर्टर्स, शवागृह, रुग्णवाहिका पार्किंग, ऑक्सिजन प्लांट, सेक्मयुरिटी रुम उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगितले.
मलप्रभा नदीकाठी संरक्षक भिंतीसाठी 16 कोटी
मलप्रभा नदीला येणाऱया पुरामुळे गेल्या दोन वर्षांपासून खानापूर शहराजवळील दुर्गानगर आणि पोलीस प्रशिक्षण केंद्राला मोठा फटका बसत आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूला संरक्षक भिंतीची उभारणी करण्यासाठी 16 कोटींचा निधी मंजूर केला आहे. तसेच आमगाव रस्त्यावरील पूलवजा बंधऱयासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामांच्या निविदाही निघाल्या आहेत. पण वनखात्याने ना हरकत प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ चालविल्याने काम सुरू होण्यास अडचण निर्माण झाली आहे.









