कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन
बेळगाव : अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त समाज विकास महामंडळ अध्यक्षा जी. पल्लवी व त्यांचे खासगी सचिव आनंदकुमार एकलव्य यांना तात्काळ पदावरून बडतर्फ करावे. जर कारवाई केली नाही तर राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राज्य अनुसूचित जाती-जमाती संघ, भटक्या विमुक्त सेवा संघ, अनुसूचित जाती भटक्या विमुक्त कल्याण समितीतर्फे देण्यात आला आहे. 5 जुलै रोजी बेंगळूर येथे झालेल्या 49 अनुसूचित जाती-जमाती व भटक्या विमुक्त समाजाच्या नेत्यांची माजी मंत्री एच. अंजनेय यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली होती. यावेळी मंडळ अध्यक्षांनी नेत्यांवर नाहक आरोप करून त्यांची बदनामी केली. यामुळे त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नसून, अध्यक्ष व सचिवांची पदावरून उचलबांगडी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी वाय. एच. माळगेण्णावर, मुतण्णा विभुती, तायाप्पा गाणगेर, सदाशिव आकेण्णावर, आनंद निपनाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.









