राहुल भगत यांच्यासह नागरिकांचा पत्रकार परिषदेत आरोप : चौकशीची मागणी
पेडणे : कोनाडी येथे सार्वजनिक बांधकाम खाते तसेच पंचायतीचा निधी जी .आय फंड वापरून मोठ्या प्रमाणात खर्च करून संरक्षणभिंत स्थानिक पंच अब्दुल नाईक यांनी बांधलेली असून या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कोनाडी येथील स्थानिक नागरिक व युवक राहूल भगत यांनी पत्रकार परिषदेत घेऊन केला. यात सरकारी अधिकारी अभियंता सामील असून त्याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी राहुल भगत यांच्यासह वाड्यावरील नागरिकांनी केली आहे. कोनाडी येते मुख्य रस्त्याच्या शेजारी स्थानिक पंच अब्दुल नाईक यांनी आपली जमीन संरक्षित करण्यासाठी सरकारचे सुमारे 40 लाख पेक्षा जास्त निधी खर्च करून संरक्षण भिंत बांधण्यात आली. मात्र या ठिकाणी भिंतीची गरज नव्हती मात्र आपली जमीन संरक्षित करण्यासाठी आणि प्लॉट तयार करण्यासाठी मातीचा भराव देऊन ही संरक्षण भिंत स्थानिक पंच अब्दुल नाईक यांनी बांधली, असा आरोप राहुल भगत यांनी यावेळी केला. वास्तविक नदीम नाईक ते सदानंद भगत यांच्या घरापर्यत रस्ता बांधकामाचे टेंडर झाले माञ हा रस्ता दुसऱ्या बाजून आपल्या जागेत वळविला. या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते गुंतले असून त्यांचीही चौकशी सरकारने करावी अशी मागणी केली. आम्हाला सरकारने न्याय द्यावा अशी भगत या ज्येष्ठ महिलेने यावेळी पत्रकार परिषदेत केली. कोनाडी भागात अनेक ठिकाणी संरक्षणभिंतीची गरज असताना नको त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधून सरकारी पैसे वळवण्याला आरोप माजी उपसरपंच आनंद कोरगावकर यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची साबांखा मंत्री तसेच मुख्यमंत्री, संबंधित खात्याकडे तक्रार केल्याचे यावेळी राहुल भगत सांगितले.









