मुंबई :
स्टेट बँक ऑफ इंडिया(एसबीआय)ची युपीआय सेवा आज 6 ऑगस्ट 2025 रोजी काही काळासाठी बंद राहील. ही माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर दिली. त्यानुसार देखभालीच्या कामामुळे 6 ऑगस्ट 2025 रोजी युपीआय सेवा 20 मिनिटांसाठी उपलब्ध राहणार नाहीत.
युपीआय सेवा किती वाजेपर्यंत बंद राहणार?
एसबीआयच्या एका पोस्टमध्ये, युपीआय सेवा 6 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1:00 ते 1:20 वाजेपर्यंत तात्पुरती बंद राहतील. या काळात देखभालीचे काम केले जाईल. बँकेने म्हटले आहे की जर ग्राहकांना यावेळी युपीआय वापरायचे असेल तर ते युपीआय लाईट वापरू शकतात.









