वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक (एसबीआय) यांनी ग्राहकांसाठी चांगली बातमी दिली आहे. यामध्ये बँकेने दोन कोटी रुपये आणि त्यापेक्षा अधिकच्या डोमेस्टिक बल्क टर्म डिपॉझिट्सवर व्याजदर वाढविले आहेत.
जास्तीत जास्त बल्क टर्म डिपॉझिट्वर 40 ते 90 बीपीएसची वाढ केली आहे. नवीन दर मंगळवारपासून लागू होणार असल्याची माहिती आहे. आरबीआयने आपला रेपोदर 0.40 बीपीएसने वाढविल्याने देशातील विविध बँका आपल्या ठेवीवरील व्याजदरात वाढ करत असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भातील अधिकची माहिती बँकेने आपल्या वेबसाईटर दिली आहे. इतर बँकांही आता दर वाढवतील. असे दिसते.









