बेळगावचे नूतन प्रादेशिक आयुक्तपदी एस बी शेट्टेन्नवर यांची नियुक्ती करून राज्य सरकारने आदेश दिला आहे.
सद्या बेंगळूर येथील हट्टी गोल्ड माईन्स कंपनीचे व्यवस्थापक म्हणून संजय बी शेट्टेन्नवर सेवा बजावत आहेत. बेळगाव मूळचे एस बी शेट्टेन्नवर यापूर्वी हावेरी व विजापूर जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी पार पाडली असून शुक्रवारी ते नूतन प्रादेशिक आयुक्तपदाचे अधिकारग्रहण करणार आहेत.









