कोल्हापुरची सायली भोसले राज्यसेवा मुख्य परीक्षेत चमकली
कोल्हापूर : राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ (वर्ग १,२) ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी गुरूवारी एमपीएससीच्या संकेत स्थळावर जाहीर करण्यात आली. यामध्ये कसबा बावडा येथील सायली किरण भोसले ही अनुसूचित जाती प्रवर्गातून मुलींमध्ये राज्यात दुसरी आली. सायली यांचे शालेय शिक्षण कोल्हा-पुरातील एमएलजी झाले हायस्कूल येथे आहे.
तर न्यू पनवेल येथील पिलाई कॉलेज ऑफ इनफॉरमेशन टेक्नॉलॉजी येथून इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलि-कम्युनिकेशनमधून त्यांनी पदवी घेतली आहे. २०२० सालापासून त्या आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास करत आहेत. रोज आठ ते नऊ तास अभ्यास करत होत्या.
त्यामुळेच त्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत यशस्वी झाल्या. त्यांना ५४२.५० गुण मिळाले. त्यांना संकल्प देशमुख, राजकुमार पाटील, वडील सहा. पोलीस निरीक्षक किरण भोसले व आई रुपाली भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.








