वृत्तसंस्था/ शाजापूर
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या मध्यप्रदेशात आहे. मध्यप्रदेशच्या शाजापूरमध्ये राहुल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. लोकांनी दिवसभर जय श्रीराम म्हणावे आणि उपाशी मरावे अशी मोदींची इच्छा असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. तर राहुल गांधी यांच्यासमोर उपस्थित समुदायाने मोदी-मोदी आणि जय श्रीराम अशा घोषणा दिल्याने स्थानिक काँग्रेस नेत्यांची चांगलीच कोंडी झाली. यावेळी राहुल गांधी यांना भाजप कार्यकर्त्यांनी बटाटे दिले आणि त्यातून सोने तयार करून देण्यास सांगितले. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.









