Kolhapur Crime News : कौटुंबिक वादातून सावर्डे बुद्रुक ता.कागल येथे दोन कुटुंबात कोयता,कुहाड व लोखंडी गजाने झालेल्या तूंबळ मारहाणीत चारजण गंभीर जखमी झाले आहेत.या गंभीर जखमींना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.घटनेची नोंद मुरगूड पोलीस ठाण्यात झाली असून रात्री उशिरापर्यंत संशयितांना अटक करण्याचे काम सुरू होते.
याबाबत माहिती अशी, येथील मधुकर पाटोळे आणि आनंदा पाटोळे या दोन्ही कुटुंबात एकमेकांची डोके फुटेपर्यंत हाणामारी झाली. या दोन्ही कुटुंबांमध्ये यापूर्वीही किरकोळ कारणावरून वादावादी होत असल्याचे समजते.सोमवारीही किरकोळ कारणाचे निमित्त होत सांडपाणी दारात सोडल्याच्या कारणावरून दोन्ही कुटुंबामध्ये मोठ्या हाणामारी झाले. यामध्ये लोखंडी गज,विटा, कुऱ्हाड व कोयत्याचा सर्रास वापर करण्यात आला.यामुळे तिघा जणांना गंभीर दुखापत झाली असून आनंदा पाटोळे व सुरेश पाटोळे,संग्राम पाटोळे यांच्या डोक्याला मार लागला आहे.तर लक्ष्मी पाटोळे,अविनाश पाटोळे,नंदा पाटोळे यांचाही या हाणामारीत सहभाग असल्याचे मुरगुड पोलिसांकडून सांगण्यात आले.दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रारी करण्यात आली आहे.
कोल्हापूरच्या महत्त्वाच्या घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Previous Articleपती मुलीला ओरडल्याच्या रागातून विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न
Next Article ज्योती महाविद्यालयात पालक मेळावा









