सावंतवाडी | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची वेंगुर्ले आगाराची सावंतवाडी_ वेंगुर्ला एसटी बस शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी मोती तलावाशेजारी बिघाड झाल्याने बंद पडली. त्यामुळे एसटीतील प्रवाशांनी दुसऱ्या एसटीचा आधार घेतला. त्यानंतर सावंतवाडी आगाराच्या दुरुस्ती पथक घटनास्थळी दाखल झाले. तब्बल एक तासाहून अधिक वेळ एसटीतील हा बिघाड दुरुस्ती करण्याचे काम सुरू होते.









