सावंतवाडी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपतालुकाप्रमुखपदी संदीप पांढरे ,युवासेना विभाग प्रमुख पदी रोहन मल्हार, निरवडे शिवसेना शाखाप्रमुख संदीप बाईत,युवासेना शाखाप्रमुख म्हणून मधुकर भाईडकर यांची निवड जिल्हाप्रमुख संजय पडते व तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी जाहीर केली.सावंतवाडी तालुक्यात ग्रामीण भागात शिवसेना मजबूत करण्यासाठी युवा कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे.या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी नियुक्ती पत्र आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ,दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस,वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत परब,शहर प्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी,युवासेना तालुका पदाधिकारी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे,चंद्रकांत कासार,महिला तालुकाप्रमुख भारती कासार,मिलिंद नाईक,अशोक परब ,चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









