सावंतवाडी प्रतिनिधी
नागरिकांनी सायकल तसेच जुने कपडे बँकेत जमा करण्याचे क्लबकडून आवाहन
सावंतवाडी रोटरी क्लब तर्फे सायकल बँक व क्लोथ बँक येत्या 1 ऑगस्टपासून चालू करण्यात येणार आहे. ज्या व्यक्तींकडे सुस्थितीत सायकल तसेच जुने कपडे असतील त्यांनी या बँकेमध्ये आणून जमा करावेत . या जुन्या वस्तू, सायकल गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. तर जुने कपडे कोल्हापूर आदी मोठ्या शहरात गरजू व्यक्तींना ,महारोगी सेवा संस्था आनंदवन तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैयक्तिक गरजूंना वाटप करण्यात येणार आहेत. तरी, ज्या व्यक्तींना जुन्या सायकली व जुने कपडे जमा करायचे असेल त्यांनी सावंतवाडी साधले मेस समोरील रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट च्या कार्यालयाकडे जमा करावीत . अधिक माहितीसाठी आबा कशाळी कर व सचिव प्रवीण परब 9422633993 यांच्याकडे अधिक माहितीसाठी संपर्क साधावा असे आव्हान अध्यक्ष सुहास सातोस्कर यांनी केले आहे.









