सावंतवाडी / प्रतिनिधी
सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची अखेर बदली करण्यात आली आहे. गेली अडीच वर्ष ते या पालिकेचे कारभार हाकत होते. गेल्या दोन वर्ष पालिकेवर प्रशासकीय राज आले आहे. या कालावधीत श्री जावडेकर यांनी हम करोसो कायदा प्रमाणे त्यांचे वागणे असल्याने ते राजकीय वर्तुळात वादग्रस्त ठरले होते. श्री जावडेकर यांच्या जागी ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सागर साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री जावडेकर यांची अद्यापही बदलीचे ठिकाण त्यांना देण्यात आले नसून त्यांना पालिकेच्या मुख्याधिकारी पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे. तर नवनियुक्त मुख्याधिकारी श्री साळुंखे यांनी आज गुरुवारी सायंकाळी कार्यभार हाती घेतला.








