सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा- २०२५ चे आयोजन शनिवार 19 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता सावंतवाडी येथील गोविंद चित्र मंदिर बहुउद्देशीय सभागृहामध्ये करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री नामदार श्रीपाद नाईक तसेच राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा माजी मंत्री आणि सावंतवाडी विधानसभा मतदार सघाचे आमदार दीपक केसरकर तसेच गोवा राज्याचे मांजरे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांच्या उपस्थितीमध्ये होणारे या कार्यक्रमा मध्ये सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या सोहळ्यामध्ये पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या पत्रकार आणि अतुलनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे. तर या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार सचिव मयूर चराटकर खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांनी केले आहे
या कार्यक्रमासाठी
प्रमुख पाहुणे व उद्घाटक :
ना. श्री. श्रीपाद नाईक केंद्रीय मंत्री भारत सरकार,
ना. श्री. दीपक केसरकर शालेय शिक्षण व मराठी भाषा माजी मंत्री , नवनिर्वाचित आमदार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ.
मा.आमदार श्री. जीत आरोलकर ,मांद्रे-गोवा मतदारसंघ.तथा अध्यक्ष गृहनिर्माण महामंडळ, गोवा राज्य
मा.श्री मनीष दळवी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लि.
मा.माजी नगराध्यक्ष. सच्चिदानंद उर्फ संजू परब सावंतवाडी नगरपरिषद
मा.अॅड अस्मिता सावंत – भोसले संस्थापक अध्यक्षा, यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी चराठे.
मा. श्री अच्युत सावंत – भोसले , कार्यकारी अध्यक्ष यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी चराठे. यांना निमंत्रित करण्यात आले आहे तर या कार्यक्रमासाठी
प्रमुख उपस्थिती मध्ये
मा.श्री. उमेश तोरस्कर,अध्यक्ष-सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ.
मा.श्री. बाळ खडपकर,सचिव-सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ.
मा.श्री. संतोष सावंत खजिनदार, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ.
मा.श्री. गणेश जेठे, मराठी पत्रकार परिषद प्रतिनिधी
मा.श्री. वसंत उर्फ अण्णा केसरकर ज्येष्ठ पत्रकार सावंतवाडी
मा.श्री. गजानन नाईक ज्येष्ठ पत्रकार सावंतवाडी
मा.श्री.अभिमन्यू लोंढे, ज्येष्ठ पत्रकार सावंतवाडी
मा.श्री.अमोल टेंबकर, जिल्हाध्यक्ष, जिल्हा डिजिटल मीडिया सिंधुदुर्ग.
मा.श्री. महेंद्र किणी कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग सावंतवाडी.
मा.श्री. वैभव सगरे उपअभियंता सा.बां. विभाग सावंतवाडी.
मा.श्री. हेमंत निकम, प्रांताधिकारी सावंतवाडी.
मा.सौ अश्विनी पाटील, मुख्याधिकारी सावंतवाडी
मा.श्री. बाबुराव धुरी माजी पंचायत समिती सदस्य दोडामार्ग
मा.श्री. उदय भोसले, युवा उद्योजक सावंतवाडी
मा.श्री. रूपेश राऊळ माजी पंचायत समिती सदस्य सावंतवाडी
मा.श्री. खेमराज उर्फ बाबू कुडतरकर माजी नगरसेवक सावंतवाडी
मा.श्री. सुरेश गवस ज्येष्ठ नेते
मा.डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे वैद्यकीय अधीक्षक,सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय. यांची उपस्थिती असणार आहे
या कार्यक्रमांमध्ये पुरस्कार विजेते पत्रकार*
श्री नागेश पाटील, वैनतेयकार मे.द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार, श्री अवधूत पोईपकर,कै. जयानंद मठकर पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार
पुरस्कार,.श्री महादेव परांजपे,कै. पांडुरंग स्वार स्मृती जीवनगौरव पुरस्कार,श्री प्रवीण परब नाट्यकर्मी कै . बाप्पा धारणकर स्मृती पुरस्कार,श्री विश्वनाथ नाईक आदर्श समाजसेवक कै चंदू वाडीकर स्मृती पुरस्कार,श्री अजित दळवी,ज्येष्ठ छायाचित्रकार कै. मुरलीधर तथा बंडोपंत भिसे स्मरणार्थ छायाचित्रकार पुरस्कार यांना प्रदान करण्यात येणार आहे सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने
पत्रकार पुरस्कार निवड समितीचे गठण करण्यात आले होते यामध्ये
* डॉ. गिरीश कुमार चौगुले सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक ,
* डॉ. विनया बाड,आहार तज्ञ
श्री.उदय भोसले, युवा उद्योजक ,
श्री.ॲड. संदीप निंबाळकर,वकील प्रतिनिधी
श्री सागर चव्हाण,माजी आदर्श पत्रकार विजेते ,
श्री सचिन रेडकर,युवा पत्रकार
*निवड समितीचे पदसिद्ध पदाधिकारी म्हणून
श्री हरिश्चंद्र पवार, अध्यक्ष,सावंतवाडी तालुका पत्रकार संघ
श्री मयूर चराटकर,सचिव
श्री रामचंद्र कुडाळकर खजिनदार.तसेच कै.प्रवीण मांजरेकर, सहसचिव, जिल्हा पत्रकार संघ सिंधुदुर्ग यांचाही या समितीत समावेश करण्यात आला होता तरी कार्यक्रमाात सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे
Previous Articleशक्तीपीठ महामार्गाचे सर्व्हेक्षण हाणून पाडा
Next Article विहिरीत पडलेल्या घारीला ग्रामस्थांकडून जीवदान !









