सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत शिवाय चिवार टेकडी येथील पाण्याची साठवण टाकी 9 ऑगस्ट रोजी साफ करण्यात येणार आहे. त्यामुळे 9 व 10 ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या टाकीवरून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या सबनीसवाडा ,बाहेरचावाडा ,काजरेकर घरापासून काजरकोंड पर्यंत, सिक्वेरावाडा , लाडाची बाग, सुवर्ण कॉलनी , बिरोडकर टेंब, कॉटेज हॉस्पिटल, आयुर्वेद हॉस्पिटल, खासकीलवाडा ,म्हादळभाट, कामत लाईन, रसाळ पाणंद , तिलारी रोड, समाजमंदिर परिसर, जिमखाना मैदान, गोठण वझरवाडी ,नाडकर्णी पाणंद, चराटा ग्रामपंचायत, यांनी नोंद घ्यावी . त्यापुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे असे आवाहन नगर परिषदेने प्रसिद्धी पत्रकार द्वारे केले आहे.