सावंतवाडी /वार्ताहर –
सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना विभागात उत्कृष्ट मुख्याधिकारी म्हणून सन्मान झाला त्याबद्दल सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी त्यांचा सत्कार केला. केसरकर म्हणाले, सावंतवाडी नगरपालिका मुख्याधिकारी म्हणून जयंत जावडेकर हे उत्कृष्ट काम करत आहेत. शासनाच्या विविध योजना ते जनतेपर्यंत पोहोचत आहेत असेच काम त्याने करत राहावे. यावेळी माजी नगराध्यक्ष अनारोजीन लोबो माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे बांधकाम अधिकारी शिवप्रसाद कुडपकर आदी उपस्थित होते.









