सावंतवाडी / प्रतिनिधी
Sawantwadi bus station asphalting work stopped by citizens!
सावंतवाडी बसस्थानककात मंगळवारी एसटी महामंडळाच्या वतीने खडीकरण आणि डांबरीकरणाचे काम सुरू होते .परंतु हे काम तात्पुरत्या स्वरूपाचे असल्याने नागरिक आणि प्रवासी संघटनेने बंद पडले .माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा संघटनेचे सुनील नाईक, प्रवासी संघटनेचे वसंत केसरकर ,माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे ,यशवंत देसाई यांच्यासह यावेळी असंख्य नागरिक उपस्थित होते. सावंतवाडी बस स्थानकासमोर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या परिसरात सध्या धुळीचे वातावरण आहे. पावसाळ्यात या खड्ड्यामध्ये पाणी साचून याचा त्रास प्रवाशांना होत आहे .त्यामुळे या ठिकाणी खडीकरण व डांबरीकरण करावे अशी मागणी प्रवाशांची होती या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात खडीकरण व डांबरीकरण करण्यास शुक्रवारी सुरुवात केली .परंतु हे खडीकरण डांबरीकरण केवळ धूळफेक असल्याने याबाबत नागरिक व प्रवासी संघटनेने पुढे येऊन हे काम बंद पडले. त्यानंतर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी एस टी महामंडळाच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना समोर चर्चेला आणण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार एस टी महामंडळाच्या बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता गिरजा पाटील सावंतवाडीत दाखल झाल्या.
त्यांच्याशी या सर्वांनी चर्चा केली साळगावकर यांनी 2017 मध्ये बस स्थानकाला पाच कोटी रुपये मंजूर झाले .परंतु अद्यापही काम अर्धवट आहे. या या ठेकेदाराला कामामध्ये हलगर्जी केल्यामुळे ब्लॅक लिस्टमध्ये तत्काल टाकावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इचारा दिला .तर सावंतवाडीत बस स्थानकासमोर तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येणारे खडीकरण व डांबरीकरण चुकीचे आहे. पूर्ण बस स्थानक परिसरात खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे यासंबंधी तत्काळ पावले उचलण्यात यावी तोपर्यंत हे काम करण्यात येऊ नये असे स्पष्ट केले .पाटील यांनी आपल्याला केवळ पस्तीस हजार रुपयापर्यंत काम करण्यास अनुमती आहे .यापेक्षा जास्त खर्च झाल्यास वरिष्ठ स्तरावर याबाबत अनुमती घ्यावी लागते असे स्पष्ट केले .बस स्थानकासमोर तात्पुरत्या पाथर्डीकरण व डांबरीकरण करण्यात येत असले, तरी लवकरच संपूर्ण परिसरात काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे .त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात खडीकरण व डांबरीकरण करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत माजी नगरसेवक विलास जाधव यांनी संताप व्यक्त केला. तात्पुरत्या स्वरूपात खडीकरण व डांबरीकरण कशासाठी शेवटी प्रवाशांना त्रास होणारच त्यामुळे पूर्ण काम करण्यात यावे अशी मागणी केली. प्रवासी संघटनेचे वसंत केसरकर यांनी बसस्थानकाला दिरंगाई होत आहे .त्याचा त्रास प्रवाशांना होत आहे. त्यामुळे याबाबत तत्काळ पावले उचलून बसस्थानकाचे काम पूर्ण करण्यात यावे स्पष्ट केले. शिवसेना ठाकरे गटाचे शब्बीर मणियार यांनी यासंदर्भात जाब विचारला .खडीकरण व डांबरीकरण केले गेल्यास आम्ही ते रोखु असे स्पष्ट केले .यावेळी उपस्थित बसस्थानका चे काम पूर्णत्वास येत नाही ,दिरंगाई होत आहे त्यामुळे प्रवाशांना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे .पाच कोटी रुपये मंजूर होऊ नये ठेकेदार दिरंगाई करत असेल तर त्याच्यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी केली.









