सावंतवाडी –
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान 2025 अंतर्गत प्रादेशिक स्तरावरील वर्गातील बस स्थानक व आगाराची पाच सदस्यीय समितीने मंगळवारी सावंतवाडी बस स्थानकाला भेट देऊन सर्वेक्षण करून मूल्यांकन करण्यात आले. या सर्वेक्षणात आगार परिसराची स्वच्छता, इमारत, सुलभ शौचालय इमारत ,वाहक – चालक कर्मचाऱ्यांचे विश्रांतीगृह आदींची पाहणी केली. या समितीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक अनघा बारटक्के ,प्रादेशिक अभियंता अशोक पन्हाळकर ,रत्नागिरी एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक तथा सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे ,दैनिक तरुण भारत संवाद सावंतवाडीचे पत्रकार उमेश सावंत, प्रवासी मित्र मयूर मालवीय या पाच सदस्यांनी पाहणी करून मूल्यांकन केले. राज्याचे परिवहन मंत्री यांच्या निर्देशानुसार सन 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने सर्व बसस्थानक व प्रादेशिक स्तरावरील स्थानकासाठी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान 2025 राज्य पातळीवर राबविण्यात येत आहे.
Previous Articleदुष्काळी माणमध्ये पावसाने कोट्यवधीचे नुकसान
Next Article चोवीस तासांत चोरीचा गुन्हा उघड









