सावंतवाडी प्रतिनिधी
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट सावंतवाडी तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतली . आणि त्यांचे जंगी स्वागत मोपा विमानतळावर येथे केले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जावेद खतीब ,गुरुनाथ पेडणेकर ,गुरु सावंत, महेश पांचाळ आदी उपस्थित होते. श्री परब यांनी नार्वेकर यांच्याशी चर्चा केली. श्री नार्वेकर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी मुंबईहून विमानाने मोपा येथे आल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले.









