वार्ताहर /सावईवेरे
स्वावलंबी भारत अभियान अंतर्गत कोकण प्रांतचा दोन दिवशीय प्रशिक्षण वर्ग गोव्यातील सावईवेरे येथील श्री अनंत देवस्थानच्या सभागृहात नुकताच यशस्वीरित्या संपन्न झाला. या वर्गाचा एकूण 26 जणांनी लाभ घेतला. या वर्गाचे उद्घाटन उद्योजक संदीप निगळ्यो यांच्याहस्ते करण्यता आले. संदीप निगळ्यो, व अजय पत्की यांनी मार्गदर्शन केले. उद्घाटन व समारोप धरून एकूण 9 सत्रे घेण्यात आली, सर्व सत्रांमध्ये राजगार सृजन केंद्र हा विषय केंद्रबिंदू ठरला. यावेळी एकूण 17 कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ.जयंत माने यांनी उद्योजकता, भारतीय किसान संघाचे प्रांत मंत्री धनंजय यांनी कृषी विषयक, गोवा विभाग प्रचारक राजभाऊ कोलपे यांनी कौशल्य विकास, हिंदु रोजगार डॉट कॉमचे सीईओ संतोष यांनी सरकारी योजना विषयक, राजीव क्षीरसागर यांनी ‘हम सबने आगे बढना है’ ही सत्रे घेण्यात आली. वर्गाचा समारोप सोहळा स्वदेशी जागरण मंच राष्ट्रीय महिला प्रमुख अमिता पत्की, गोवा विभाग संघचालक राजेंद्र भोबे, स्वदेशी जागरण मंच क्षेत्र समन्वयक प्रशांत देशपांडे व भारतीय किसान संघाचे प्रांत मंत्री श्रीरंग जांभळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना अमिता पत्की, म्हणाल्या की आजचे युग हे स्पर्धात्मक युग असल्याने व्यवसाय करताना थोडेस चौकस राहत समाजात होत असलेल्या परिवर्तनाबाबत जागृत राहणे अंत्यत गरजेचे आहे. व्यवसायात सृजनशीलता व कल्पकतेबरोबरच सातत्य व धैर्यता जर असेल तर कोणत्याही व्यवसायात यशस्वी व्हाल हे अभियान तसेच केंद्र उत्तम पद्धतीने चालू शकेल असे सांगून त्यानी विविध उदाहरणे देत स्पष्ट केले. कल्याण मंत्राने वर्गाची सांगता झाली. भारतीय किसान संघाचे प्रांत मंत्री श्रीरंग जांभळे, महाव्यवस्थापक महेश शिलकर व अध्यक्ष संजीव यांच्या नेतृत्वाखाली व कार्यकर्त्याच्या सहकार्याने हा वर्ग यशस्वीरित्या संपन्न झाला.









