प्रतिनिधी/ बेळगाव
मच्छे बाल शिवाजी वाचनालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी विद्यार्थिनीनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन केले. कान्सुली माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक विनायक चौगुले व वाचनालयाचे माजी अध्यक्ष बजरंग धामणेकर यांनी सावित्रीबाई फुलेंच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला.
महाराष्ट्राने जितके क्रांतिकारी दिले तितकेच समाजसुधारकही दिले. त्यांचा वारसा विद्यार्थ्यांनी चालवावा व शैक्षणिक प्रगती करावी, असे सांगितले. कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.









