नवी दिल्ली :
सर्वात मोठी स्मार्टफोन प्रोसेसर निर्माता कंपनी क्वालकॉम यांनी शुक्रवारी सावी सोनी सोईन यांची क्वालकॉम इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. मागील पाच वर्षांपासून क्वालकॉम इंडियाचे अध्यक्ष राजेन वगाडिया आता सॅन दिएगो येथील मुख्यालयात जागतिक वितरण व जागतिक करिअर धोरणाच्या उपाध्यक्षाची भूमिका स्वीकारणार आहेत.









