पंचकमिटी ग्रामस्थांचे विविध खात्यांना निवेदन
बेळगाव : सालाबाद प्रमाणे यंदाही सावगाव येथील श्री काळभैरव यात्रा आयोजित करण्यात आली आहे. दि. 13 आणि 14 फेब्रुवारी दोन दिवस यात्रा चालणार असून या काळात वीज पुरवठा, अतिरिक्त बस सेवा, पोलीस बंदोबस्त त्याचबरोबर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, या मागणीसाठी देवस्की पंच व ग्रामस्थ कमिटी आणि सावगाव ग्रामस्थांच्यावतीने विविध खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सावगाव गावचे जागृत देवस्थान श्री काळभैरव देवाची यात्रा दरवषी आयोजित केली जाते. तर तीन वर्षातून एकदा यात्रा मोठ्या प्रमाणात भरवली जाते. त्यामुळे यंदा यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाणार आहे. यात्रा काळात ग्रामस्थ आणि येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पंच कमिटी आणि ग्रामस्थांच्यावतीने खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा काळात दोन दिवस कायम वीजपुरवठा सुरू ठेवण्यात यावा या मागणीसाठी हेस्कॉमला, पिण्याचे पाणी व इतर सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीला, कायदा सुव्यवस्थेचा प्रŽ निर्माण होऊ नये यासाठी पोलीस खाते आणि यात्रेला येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी यासाठी परिवहनच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी यल्लाप्पा पाटील, आप्पाजी पाटील, भुजंग पाटील, यल्लाप्पा पाटील, कृष्णा पाटील, नारायण कडलीकर आदीसह इतर उपस्थित होते.









