ताण पिढीला माहिती उपलब्ध होण्यासाठी म्हादईप्रेमां निर्धार : विविध ठिकाणाया पाणवठय़ीं घेतली माहिती
उदय सावंत / वाळपई
म्हादई रक्षणासाठी विर्डी येथील आयोजित सभेला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभला. म्हादईाया रक्षणासाठी विविध संघटना पुढाकार घेत आहेत. दरम्यान, सत्तरी तालुक्यातील काही म्हादईप्रेमींनी नदीची परिक्रमा सुरू केली असून यामध्ये शास्त्राrय माहिती व जैवविविधता या संदर्भाचा सविस्तरपणे अभ्यास करण्याचा निर्धार घेतला आहे.
दोन दिवसांपासून ही परिक्रमा सुरू असून यामध्ये सत्तरी तालुक्यातील काही पर्यावरणप्रेमी यामध्ये भाग घेत आहेत. संपूर्ण म्हादई नदीचा सविस्तर अभ्यास या परिक्रमा उपक्रमाद्वारे करण्यात येणार आहे. या अहवाल तयार करण्यात येणार आहे. या परिक्रमेला धावे भागातून सुरुवात झाली. दोन दिवसांपूर्वी नदीचे पूजन करून त्याला सुरुवात करण्यात आली. झिलू गावकर, डॉ. रघुनाथ धुरी, प्रदीप गंवडळकर, दिनेश सावंत, शाबा गावस, प्रकाश गावकर, राघोबा पेडणेकर, कल्पेश गावस अशा अनेक जणांचा समावेश असलेली ही परिक्रमा उस्ते गावातून सुप्रसिद्ध असलेल्या कृष्णापूर येथील पिस्त्याची कोंड या ठिकाणी करण्यात आली.
यावेळी नदीच्या ठिकाणी पाण्याचा साठा, सभोवताली असलेले जंगल, काठावर असलेली नैसर्गिक जंगल संपत्ती या संदर्भाचा सविस्तरपणे अभ्यास करण्यात आला. नदीच्या काठावरील व डोंगर भागातील जैविक संपत्तीाया निर्मितीमध्ये म्हादई नदीचे महत्त्वाचे योगदान आहे. यामुळे म्हादई नदीचे पाणी सुकल्यास त्याचे गंभीर परिणाम जैवविविधतेवर होऊन त्यो दुरगामी परिणाम गोव्यातील जनजीवनावर होऊ शकते. यासाठी या नदीचे अस्तित्व टिकून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणूना या परिक्रमेला महत्त्व प्राप्त झाले आहे, अशी प्रतिक्रिया यामध्ये सहभाग घेणारे झिलू गावकर यांनी व्यक्त केली आहे.
तुळस कोंड दुर्मीळ माशांच्या पैदासो ठिकाण
कृष्णापूरमधून वाहणाऱया नदीच्या ठिकाणी सुका पानशिरा व ओला पानशिरा असे दोन महत्त्वाचे नैसर्गिक स्त्राsत आहेत. याचठिकाणी सुक्या पानशिरावर एक तुळस कोंड आहे. तुळस कोंड पर्यावरणीयदृष्टय़ा महत्त्वाची आहे. कारण या नैसर्गिक स्त्राsतात अनेक माशांच्या प्रजाती आहेत. या नदीच्या प्रवाहात अनेक ठिकाणी बारामाही पाणी साठून राहते. या पाण्यामध्ये माशांच्या प्रजाती अस्तित्वात आहेत. कदाचित कर्नाटकाने पाणी पूर्णपणे वळविण्याचा प्रयत्न केल्यास येथील पाण्या स्त्राsत कोराडा पडून येथील माशांच्या प्रजातीही नष्ट होण्याची भीती गावकऱयांनी व्यक्त केलेली.
वाघदोरो येथील वाघांचा सांर
म्हादई नदाया खोऱयातील वाघदोरा परिसर पूर्णपणे घनदाट जंगलाने वेढलेला आहे.
येथील मध्यवर्ती भागात पाण्याचा साठा आढळतो. या भागात वाघां हमखास वावर असता. त्यावरूना याला वाघदोरो हे प्रचलित झाले आहे, असे जाणकारांनी सांगितले. सदर भागांमध्ये बारामाही पाण्याचा साठा असतो. यामुळे वाघां या ठिकाणी मुक्तपणे सांर असतो, अशी माहिती उपलब्ध झाली.
अभ्यासपूर्ण आंदोलनी गरज!
आजच्या पिढीकडे म्हादईबाबत विस्तृत माहिती नाही, हे दुर्दैव आहे. आज या नदीवर मोठे संकट निर्माण झालेले आहे. यामुळे पुढील काळात यावर मात करण्यासाठी अभ्यासपूर्ण आंदोलन उभारण्यी गरज आहे. यासाठी आजच्या तरुणांना म्हादईााs अस्तित्व व त्यी माहिती असणे आवश्यक आहे. ही माहिती रितसर वपुराव्यानिशी गोळा करण्यासाठी ही परिक्रमा आयोजित केली आहे. या परिक्रमेच्या माध्यमातून संपूर्ण म्हादई नदीचे पात्रााााr पाहणी करण्यात येणार असून यातून अनेक महत्त्वाचे दस्तऐवज समोर येणार आहेत. शास्त्राrयदृष्टय़ा या नदीचे रक्षण व महत्त्व आजच्या तरुण पिढीला अवगत व्हावे, यासाठी हा अभ्यास पूर्ण दौरा आयोजित केला आहे. या अभ्यास दौऱयात म्हादईप्रेमींनी मोठय़ा प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन रघुनाथ धुरी व इतरांनी केले आहे.









