वृत्तसंस्था/ शीमकेंट, कझाकस्तान
10 मीटर एअर पिस्तूल मिश्र्र सांघिक स्पर्धेत भारताच्या सौरभ-सुऊची या जोडीने कांस्यपदक पटकावले. आशियाई नेमबाजी स्पर्धेत बुधवारी भारतीय जोडी सौरभ चौधरी आणि उदयोन्मुख किशोरवयीन स्टार सुऊची इंदर सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र्र सांघिक स्पर्धेत चिनी तैपेईच्या जोडीचा पराभव करून कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
या जोडीने लिऊ हेंग-यू आणि सीह सियांग-चेन यांचा 17-9 असा पराभव करत पदक फेरीसाठी पात्रता मिळवली. पात्रता फेरीत सुऊचीने 292 आणि सौरभने 286 गुणांसह पाचवे स्थान मिळवताना एकूण 578 गुण मिळवले. या हंगामात चार विश्वचषक पदके जिंकलेल्या सुऊचीने पहिल्या पात्रतेच्या फेरीत परिपूर्ण 100 गुणांसह चांगली सुऊवात केली. दुसऱ्या फेरीत तिने 94 गुण घेतले आणि प्राथमिक शेवटच्या फेरीत 98 गुण घेतले. सौरभ चौधरीने पात्रता फेरीत 95, 96, 95 गुण घेत पदकाच्या फेरीत प्रवेश मिळविला होता.









