वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशीप स्पर्धेत नेमबाज सौरभ तिवारीने पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजी प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवित भारतीय नेमबाज संघात स्थान मिळविण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सौरभ चौधरीने साफ निराशा केली. त्यानंतर त्याला खांदा दुखापतीच्या समस्येने चांगलेच दमविले होते. येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशीप स्पर्धेत पात्र फेरीमध्ये 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात सौरभने 591 गुणासह नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सौरभ चौधरीने मनु भाकरसमवेत 10 मी. एअर पिस्तुल मिश्र सांघिक प्रकारात आपला सहभाग दर्शविला होता.









