साडेपाच लाखाचा ऐवज जप्त
बेळगाव : सौंदत्ती व परिसरातील गावांमध्ये घरफोड्या करणाऱ्या एका अट्टल घरफोड्याला अटक करून सौंदत्ती पोलिसांनी 5 लाख 60 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. सोमवारी ही कारवाई करण्यात आली. मनोज ईश्वर शिवळ्ळी, रा. रामापूर साईट, सौंदत्ती असे त्याचे नाव आहे. त्याच्याजवळून 80 ग्रॅम 500 मिली सोने, 200 ग्रॅम चांदी व वेगवेगळ्या कंपन्यांचे आठ मोबाईल संच असा 5 लाख 60 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक रामनगौडा हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सौंदत्तीचे पोलीस निरीक्षक करुणेशगौडा जे., उपनिरीक्षक आनंद क्यारकट्टी, एस. एम. जाधव, एम. पी. तेरदाळ, बी. व्ही. हिरेमठ, ए. एस. कप्पत्ती, ए. सी. कापसी, एच. बी. वासन, बी. बी. तंगोजी आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे. त्याने सौंदत्ती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.









