शरिया कायद्यात महत्त्वपूर्ण योगदान
वृत्तसंस्था/ जेद्दाह
सौदी अरेबियाचे ग्रँड मुफ्ती आणि वरिष्ठ विद्वानांच्या परिषदेचे प्रमुख शेख अब्दुलअजीज बिन अब्दुल्ला बिन मोहम्मद अल-शेख यांच्या निधनाची घोषणा मंगळवारी रॉयल कोर्टाने (शाही दरबार) केली. सरकारी अल-एखबारियाने मंगळवारी ही माहिती जाहीर केली. रियाधमधील इमाम तुर्की बिन अब्दुल्ला मशिदीत अंतिम नमाजपठण होणार असल्याचेही सांगण्यात आले. अल-अल-शेख यांनी शरिया कायद्याचे स्पष्टीकरण देणारे आणि कायदेशीर आणि सामाजिक बाबींवर फतवे जारी करणारे राज्याचे सर्वोच्च धार्मिक विद्वान म्हणून काम केले होते. 1999 मध्ये या पदावर त्यांची नियुक्ती झाली होती.









