वार्ताहर/बांदा
महात्मा. ज्योतीबा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ ला पुण्यामध्ये ‘सत्यशोधक समाज’ या नावाची सत्य शोधणारी सामाजिक संघटना स्थापन केली. त्या संघटनेला २४ सप्टेंबर २०२३ ला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने सत्यशोधक संमेलन पुण्यामध्ये आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी भारत मुक्ती मोर्चा व बामसेफ चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम, प्रमुख उपस्थितीत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड, संस्थापक अध्यक्ष हमाल पंचायतचे बाबा आढाव, नागपूरचे प्रसिद्ध इतिहासकार प्राध्यापक मा. म. देशमुख, विशेष अतिथींमध्ये आमदार रोहित पवार, बामसेफचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वी. वी जाधव, आर. एल्.पी. ए. च्या राज्यपदाधिकारी ॲड.वासंती नालवडे आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
सदरील संमेलनामध्ये विषय:-१) सत्यशोधक समाज स्थापनेमागील उद्देश,विचारधारा व आजची प्रासंगिकता, २) सत्यशोधक समाजाचे पुनर्जीवन करणे हीच व्यवस्था परिवर्तनाची पुर्वशर्त या विषयांवर मान्यवरांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. संमेलनाचे उद्घाटक मा.शरदचंद्रजी पवार (माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) दिनांक:-२४ सप्टेंबर २०२३,रोजी सायंकाळी ०५:०० वाजता ऑल इंडिया श्नी शिवाजी मेमोरियल सोसायटी मैदान,आर.टी.ओ. ऑफिस शेजारी, पुणे.येथे होणार आहे.तरी येथे होणाऱ्या या सत्यशोधक संमेलनास सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तमाम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बामसेफ चे जिल्हा अध्यक्ष भालचंद्र जाधव, व भारत मुक्ती मोर्चा सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्ष सगुण जाधव यांनी केले आहे.









