शिलाँग
मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला. शेतकऱयांचे प्रश्न मांडण्यासाठी आपले पद गमवण्याची भीती नसल्याचे ते म्हणाले. आपण स्वतः मुळात शेतकरी असून आपले राजकीय प्रशिक्षण माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. शेतकऱयांसाठी काही सोडायचे असेल तर सोडा, पण त्यांच्यासाठी लढा आणि आवाज उठवा, असा त्यांचा दृष्टिकोन असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यपाल मलिक यांनी यापूर्वीही कृषी कायद्यांबाबत केंद्र आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.









