प्रतिनिधी /म्हार्दोळ
म्हार्दोळ येथील श्री दत्तात्रय देवस्थानात वर्षपद्धतीप्रमाणे आयोजित करण्यात येणारी वार्षिक श्री सत्यनारायण महापुजा गुरुवार दि. 5 मे 2022 रोजी सकाळी 10 वा. होणार आहे. नंतर पुराण, आरत्या व तीर्थप्रसाद होईल. संध्या. 6 वा. भजनाचा कार्यक्रम.
शुक्रवार दि. 6 मे 2022 रोजी रात्रौ 10 वा. श्री दत्तप्रासादिक नाटय़ मंडळाचे बाल कलाकारांचे संगीत पौराणिक नाटक सुवर्णतुला नाटक होईल. शनिवार दि. 7 मे रोजी रात्रौ 10 वा. श्री दत्तप्रासादिक नाटय़ मंडळातर्फे वस्त्रहरण नाटक होईल.









