मुंबईत बसलेल्या कॉंग्रेसच्या नेत्यांना तळातील परिस्थिती माहित नाही. तळागाळातील लोकं माझ्याबरोबर प्रेमाने जोडली गेली असून सर्व काँग्रेस (Congress) पक्षाचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. मी आंदोलनातून तयार झालेला कार्यकर्ता असून माझ्यावर केला जाणारा घराणेशाहीचा आरोप चुकिचा असल्याची प्रतिक्रिया नाशिक पदवीधर मतदारसंघाचे कॉग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजीत तांबे यांनी दिली. तांबे यांच्या निलंबनानंतर पहिल्यांदाच त्यांनी उघड भुमिका जाहीर करून त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.
नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये अपक्ष अर्ज भरून कॉंग्रेसशी बंडखोरी करणाऱ्या सत्यजीत तांबे यांना राज्यातील तसेच केंद्रातील वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांचा रोष ओढवून घ्यावा लागला. त्यांच्या या बंडखोरीमुळे वडिल सुधीर तांबे यांच्याबरोबरच सत्यजीत तांबे यांनाही कॉंग्रेसमधून निलंबित व्हावे लागले. आपला प्रचार करताना नाशिक दौऱ्यावर असलेले तांबे यांनी कॉंग्रेस नेत्यांवर निशाणा साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले,”माझ्यासोबत सर्वपक्षीय कार्यकर्ते असून या ठिकाणी एकच पक्ष नाहीत. मुंबईत बसलेल्या लोकांना तळागाळात काय परिस्थिती आहे याची माहित नाही. ही लोकं माझ्याबरोबर प्रेमाने जोडली गेली आहेत. निवडणुक जिंकण्यापेक्षा निवडणुकीच्या निमित्ताने लोकांपर्यंत जाऊन त्यांच्याशी संवाद करणे आणि प्रश्न समजावून घेऊन ऋणानुबंध व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करतोय.” असे ते म्हणाले.
आपली भुमिका स्पष्ट करताना तांबे म्हणाले,‘मी नाशिक आणि धुळे प्रचार दौरा करणार असून मला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना एक हक्काचा प्रतिनिधी मिळणार आहे, असे युवकांचे मत आहे. गेली २२ वर्षे संघटनेत काम करतोय. मी आंदोलनातून तयार झालेला कार्यकर्ता असून माझ्यावर घराणेशाहीचे आरोप करणं चुकीचं आहे.’ असेही यावेळी बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले.
Previous Articleकसबा पोटनिवडणुकीचा निर्णय दिल्लीतूनच
Next Article कारच्या जोरदार धडकेत दुचाकीवरील व्यक्ती गंभीर








