नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसबरोबर बंडखोरी करून अपक्ष म्हणुन उमेदवारी अर्ज धाकल केलेल्या सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांना निवडून आणण्यासाठी भाजपने (BJP) एक नवीन खेळी केल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकितील अजून एक अपक्ष उमेदवार असलेले धनंजय जाधव (Dhananjay Jadhav) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजप नेते गिरीश महाजनांकडे (Girish Mahajan) धनंजय जाघव यांना विणवणी करण्याची मोहीम दिली होती त्यात भाजपला यश आल्याचे दिसून येत आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघात रोज एक नवा टि्वस्ट पहायला मिळत आहे. बंडखोर आमदार सत्यजीत तांबे यांच्या विऱोधात आपला उमेदवार न देऊन भाजपने नवी खेळी केली. त्यानंतर सत्यजीत तांबे यांना निवडून आणण्यासाठी कलेल्या अनेक मोहिमेमध्ये धनंजय जाधव यांना माघारी घेण्यासाठी योजना आखणे ही होती. भाजप नेते गिरीश महाजन सध्या नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याचे दिसून येत आहे. आपला माघारीचा अर्ज मागे घेतल्यावर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, “गिरीशभाऊ महाजन यांच्या सूचनेनुसार व आमचे नेते ना. राधाकृष्ण विखेपाटील यांच्या आदेशानुसार, मी नाशिक पदवीधर मतदासंघांतून आपला उमेदवारी अर्ज मागे घेत आहे. या पदासाठी माझी योग्यता बघून माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी प्रयत्न करणारे खासदार डॉ. सुजयदादा विखे- पाटील यांचेही आभार, गेल्या एक वर्षापासून माझ्यासाठी प्रयत्न करणारे माझे सर्व सहकारी व पाठिंबा देणाऱ्या सर्व संघटना तसेच सर्व पदवीधर मतदारांचे मी आभार मानतो,” अशी प्रतिक्रिया धनंजय जाधव यांनी दिली आहे.
Satyajit Tambe BJP Nashik Girish mahajan teacher constituensy tbdnews
Previous Articleराम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचा कट; गुप्तचर यंत्रणांची माहिती
Next Article राजाराम महाविद्यालयातील शेकडो झाडे आगीत भस्मसात








