वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रेंच ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनने शानदार विजयाची नोंद केली, तर सात्विकसाईराज रान्कीरे•ाr आणि चिराग शेट्टी यांनीही पुऊष दुहेरीच्या विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल कायम ठेवली. 2022 मध्ये येथे विजेतेपद पटकावलेल्या सात्विक आणि चिराग या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जोडीने एरिना पोर्ते दे ला चॅपेल येथे थायलंडच्या जागतिक क्रमवारीत 32 व्या क्रमांकावर असलेल्या सुपाक जोमकोह आणि किटिनुपोंग केद्रेन यांच्यावर 21-19, 21-13 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
गुऊवारी रात्री मॅन वेई चोंग आणि काई वू टी या मलेशियाच्या जोडीला पराभूत करणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील या विजेत्या जोडीची पुढील लढत जागतिक विजेत्या आणि तिसऱ्या मानांकित कांग मिन ह्युक आणि सेओ सेंग जे यांच्याशी होईल. याच जोडीने या वर्षी जानेवारीमध्ये झालेल्या इंडिया ओपनच्या अंतिम फेरीत भारतीय जोडीला पराभूत केले होते.
दुसरीकडे, जागतिक क्रमवारीत 19 व्या क्रमांकावर असलेल्या आणि पॅरिस ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लक्ष्यने पिछाडी भरून काढत 78 मिनिटांच्या लढतीत माजी विश्वविजेत्या लोह कीन यूचा 19-21, 21-15 21-13 असा पराभव केला. हा 22 वर्षीय बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत (2017 मध्ये विजेता) आणि एच. एस. प्रणॉय (2017 मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश) यांच्यानंतर सुपर सिरीज आणि वर्ल्ड टूरच्या युगात फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा केवळ तिसरा भारतीय ठरला आहे. राष्ट्रकुल खेळांतील या विजेत्याचा उपांत्य फेरीत विश्वविजेता आणि आठवा मानांकित खेळाडू कुणालवूत विटीदसर्नशी सामना होईल.









