वृत्तसंस्था / चेंग झाऊ (चीन)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या चायना खुल्या सुपर 1000 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांचे पुरुष दुहेरीतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. मलेशियाच्या अॅरॉन चिया आणि सोह इक यांनी सात्विक आणि चिराग यांचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मलेशियाची द्वितीय मानांकीत जोडी अॅरॉन चिया आणि सोह इक यांनी सात्विक आणि चिराग यांचा 21-13, 21-17 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. 2022 च्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत तसेच दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये मलेशियाच्या या जोडीने कांस्यपदके मिळविली आहेत.









