वृत्तसंस्था/ कौलालंपूर
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या 2025 च्या हंगामातील येथे सुरु असलेल्या मलेशियन सुपर 1000 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत शनिवारी भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांचे पुरुष दुहेरीतील आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले.
पुरुष दुहेरीच्या उपांत्य लढतीत कोरीयाच्या किम वॉन हो आणि सिओ सेयुंग जेई या जोडीने भारताच्या सातव्या मानांकित सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांचा 21-10, 21-15 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. सात्विक आणि चिराग यांच्या या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. 2023 साली कोरियाच्या सिओने विश्व विजेतेपद पटकाविले होते. हा उपांत्य फेरीचा सामना केवळ 40 मिनिटे चालला होता.









