वृत्तसंस्था/ चांगझोयू, चीन
राष्ट्रकुल स्पर्धेत दुहेरीचे सुवर्णपदक मिळविणारी भारतीय जोडी सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांना येथे सुरू असलेल्या चायना ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.
येथे दुसरे मानांकन मिळालेल्या सात्विक-चिराग यांना 13 व्या मानांकित इंडोनेशियाच्या मुहम्मद शोहिबुल फिकरी व मौलाना बगस यांच्याकडून 17-21, 21-11, 17-21 असा पराभव स्वीकारावा लागला. इंडोनेशियन जोडीकडून त्यांना या वर्षात दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला आहे. मिश्र दुहेरीत एन. सिक्की रे•ाr व रोहन कपूर यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना मलेशियाच्या चेन टँग जी व तोह ई वेई यांनी 21-15, 21-16 असे हरविले. या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व भारतीय खेळाडूंचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. आशियाई स्पर्धेआधी सात्विक-चिरागचा पहिल्याच फेरीत झालेला पराभव निराशाजनक ठरला. याआधी त्यांनी स्विस ओपन सुपर 300, कोरिया ओपन व इंडोनेशिया ओपन सुपर 1000 स्पर्धेत जेतेपद पटकावले होते.









