वृत्तसंस्था/ सिंगापूर
भारताची अव्वल पुरु ष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रान्कीरे•ाr आणि चिराग शेट्टी यांनी शुक्रवारी येथे जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेली मलेशियन जोडी गोह से फेई आणि नूर इज्जुद्दीनवर सरळ गेम्समध्ये विजय मिळवत सिंगापूर ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
काही आठवडे तंदुऊस्तीच्या समस्यांशी झुंजल्यानंतर पुनरागमन करताना भारतीय जोडीने उत्कृष्ट बचावाचे प्रदर्शन घडविले आणि या सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेतील 39 मिनिटांच्या क्वॉर्टरफायनल सामन्यात 21-17, 21-15 असा विजय मिळविला. फ्रंट कोर्टवर त्यांनी अचूक नियंत्रण ठेवले. ‘हा एक मोठा विजय आहे. कारण आम्ही सध्या जगात 27 व्या क्रमांकावर आहोत. गेल्या वर्षी जेव्हा आम्ही सिंगापूरमध्ये खेळलो होतो तेव्हा आम्ही जगात अव्वल क्रमांकावर होतो. म्हणून आम्हाला गोह आणि इज्जुद्दीनला हरवता आल्याने खरोखर चांगले वाटले आहे. कारण वर्षाच्या सुऊवातीला आम्ही इंडिया ओपनच्या उपांत्य फेरीत त्यांच्याकडून हरलो होतो. हा गोड विजय आहे’, असे चिराग म्हणाला.
सात्विक आणि चिराग यांचा पुढील सामना मलेशियाच्या तिसऱ्या मानांकित आरोन चिया आणि सोह वूई यिक या जोडीशी होईल. ‘आम्ही त्यांच्याशी यापूर्वी अनेकदा खेळलो आहोत. इंडिया ओपनमध्ये आम्हाला फायदा उठवता आला नाही. पण आम्ही चांगली तयारी केली होती. आम्ही प्रतिस्पर्ध्यांच्या रणनीतीपेक्षा आमच्या रणनीतीवर जास्त लक्ष केंद्रीत करत आहोत. आम्हाला आमचा अव्वल खेळ करायचा आहे’, असे सात्विक म्हणाला. सात्विकला एप्रिलमध्ये आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागला होता आणि सुदिरमन कपला मुकावे लागले होते.
या हंगामातील भारतीय जोडीचा हा तिसरा उपांत्य सामना आहे. या वर्षाच्या सुऊवातीला मलेशिया आणि इंडिया ओपनमध्ये अंतिम चार खेळाडूंच्या टप्प्यात ते पोहोचले होते.









